
कर्कश आवाज करणाऱ्या १० दुचाकींचे सायलेन्सर जप्त; २९ हजारांचा दंड वसूल
रत्नागिरी शहर पोलिसांची धडक कारवाई;

रत्नागिरी शहरात कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १० मोटारसायकलींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत संबंधित वाहनचालकांकडून एकूण २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींमुळे नागरिकांना त्रास होत असून, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
शहरातील शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



