OBC प्रमाणपत्रावर वडेट्टीवारांचा यू-टर्न; सुप्रिया सुळेंच्या नावाचा उल्लेखाबाबत खेद व्यक्त करत म्हणाले ‘मराठा नेत्यांबाबत..’

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच आपल्या वक्तव्याबाबत खुलासा करत खेद व्यक्त केला आहे.

ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा आपला हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, सुप्रिया सुळे यांच्या नावाबाबत माघार घेतली असली तरी ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबतची आपली भूमिका बदललेली नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात मवाळ भूमिका घेतली असली, तरी मूळ राजकीय आणि सामाजिक भूमिका कायम ठेवली आहे.

सुप्रिया सुळेंच्या नावाचा उल्लेख अनावधानाने-

वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले, “ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो.”

ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो.

मात्र, याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या…

सकाळी नेमका काय केला होता दावा?

यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला होता. “माझ्याकडे कोणतेही ओबीसी प्रमाणपत्र नाही. काँग्रेसने माझे ओबीसी प्रमाणपत्र दाखवावे,” असे आव्हान त्यांनी दिले होते. त्यांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटले होते.

‘माझी भूमिका बदललेली नाही’

सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे स्पष्ट करताना वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांच्या प्रश्नावर मात्र ठाम भूमिका घेतली. ते म्हणाले, “मात्र, याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही.”

“एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचे मी कधीही समर्थन करणार नाही,” असेही वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button