‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजने’तून नवउद्योजकांना मिळणार आर्थिक बळ; समाज कल्याण विभागाचे आवाहन


रत्नागिरी, दि. २७ ) : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेअंतर्गत ‘मार्जिन मनी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नवउद्योजक व महिला उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे.

  • योजनेचे मुख्य स्वरूप व आर्थिक रचना:
  • कर्ज मर्यादा: रु. १० लाख ते रु. १ कोटी.
  • बँक कर्ज: प्रकल्प मूल्याच्या ७५ टक्के रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात.
  • मार्जिन मनी (शासकीय सहाय्य): १५ टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मार्जिन मनी स्वरूपात उपलब्ध.
  • स्वहिस्सा: केवळ १० टक्के रक्कम अर्जदाराला स्वतः भरावी लागेल.
  • पात्र व्यवसाय व निकष:
  • मान्यताप्राप्त उद्योग, उत्पादन (Manufacturing), सेवा क्षेत्र (Services), कृषीपूरक व्यवसाय किंवा ट्रेडिंग (व्यापार) सुरू करण्यासाठी ही योजना लागू आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज प्रकरण मंजूर असणे आवश्यक आहे.
  • अनुसूचित जातीतील घटकांमध्ये उद्योग उभारणीला चालना देणे आणि महिला उद्योजक तयार करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • संपर्क व अधिक माहिती:
  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button