
‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजने’तून भूमिहीन कुटुंबांना मिळणार शेतजमीन; समाज कल्याण विभागाकडून अर्जांचे आवाहन
रत्नागिरी, दि. २७ ): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे.
- जमीन व आर्थिक तरतूद:
- कोरडवाहू (जिरायती) जमीन: कमाल ४ एकरपर्यंत (प्रति एकर कमाल रु. ५ लाख मर्यादेत).
- ओलिताखालील (बागायती) जमीन: कमाल २ एकरपर्यंत (प्रति एकर कमाल रु. ८ लाख मर्यादेत).
- पात्रतेचे निकष:
- अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक.
- अर्जदार दारिद्र्यरेषेखालील (BPL) भूमिहीन असावा.
- अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असणे बंधनकारक आहे.
- निवडीमध्ये कोणाला प्राधान्य?
- दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन परित्यक्ता महिला
- दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन विधवा महिला
- अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Atrocity Act) बाधित व्यक्ती/कुटुंब
- अर्ज सादर करण्याचे ठिकाण:
- इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधून अर्ज सादर करावेत.




