‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ ; जिल्हास्तरीय निवड समिती गठित विजेत्या मंडळांना मिळणार ५०, ४० व ३० हजारांची रोख पारितोषिके; गुणांकनाच्या आधारे होणार पारदर्शक निवड


रत्नागिरी, दि. २७ ) : गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करताना शासनाच्या उपक्रमांतर्गत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सात सदस्यीय जिल्हास्तरीय निवड समिती गठित करण्यात आली आहे.

  • जिल्हास्तरीय निवड समितीची रचना:
  • अध्यक्ष: उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)
  • शासकीय सदस्य: पोलिस उपअधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी
  • अशासकीय सदस्य: समीर इंदूलकर आणि राहुल कळंबटे
  • सदस्य सचिव: जिल्हा नियोजन अधिकारी
  • निवड प्रक्रिया व निकष:
  • तालुकास्तरावरून प्राप्त झालेले परीक्षण अहवाल, छायाचित्रे, व्हिडिओ (चलचित्रे) आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निकषांनुसार मंडळांचे गुणांकन केले जाईल.
  • प्राप्त गुणांनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मंडळांची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येईल.
  • दोन किंवा अधिक मंडळांना समान गुण मिळाल्यास, ज्या मंडळाची स्थापना अधिक वर्षांपूर्वी झाली आहे, त्या जुन्या मंडळाला प्राधान्य दिले जाईल.
  • स्पर्धेत कोणत्याही परिस्थितीत विभागून पारितोषिक दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • विजेत्या मंडळांना मिळणारी रोख पारितोषिके:
  • प्रथम क्रमांक: रु. ५० हजार
  • द्वितीय क्रमांक: रु. ४० हजार
  • तृतीय क्रमांक: रु. ३० हजार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button