
रत्नागिरी जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत निधीअभावी रखडली
रत्नागिरी जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत निधीअभावी रखडली असून, सुमारे ४४ कोटी रुपये खर्चुन सुरू असलेले बांधका बांधकाम मार्च महिन्यापासून ठप्प आहे. मूळ मंजूर काम पूर्ण करण्यासाठी आणखी सुमारे १० कोटी रुपयांची आवश्यकता असून, निधी उपलब्ध न झाल्याने ठेकेदाराने काम बंद केले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्णत्वाकडे जात असतानाच निधीची अडचण निर्माण झाली आहे. मार्चपासून काम बंद असल्याने इमारतीचे बांधकाम रखडले आहे. उर्वरित कामासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, तो उपलब्ध होण्याची प्रतीक्षा प्रशासनाला आहे. मूळ बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच २० कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रस्तावामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार, उर्वरित १० कोटी रुपयांचा निधी कधी उपलब्ध होणार आणि फर्निचर व इलेक्ट्रिकल कामांच्या २० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता कधी मिळणार, याकडे जिल्हा परिषद प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उर्वरित कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात येणारी प्रशासकीय इमारत निधीअभावी रखडल्याने शासनाकडून बांधकामासाठी तातडीने आर्थिक तरतूद केली जाणार का, तसेच अतिरिक्त कामांसाठीच्या प्रस्तावाबाबत काय निर्णय होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.




