ओणी येथील कोविड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून


राजापूर तालुक्यातील ओणी येथे कोरोना काळामध्ये तत्कालिन आमदार राजन साळवी यांचा फंड वापरून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या कोविड उपचार केंद्राची इमारत गेल्या तीन-चार वर्षांपासून विनावापर पडून उभी आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी अशा पद्धतीने वाया जात असताना त्याची तमा न बाळगणार्‍या शासन प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. हे एक प्रकारे जनतेचे नुकसानच आहे. अशा प्रतिक्रिया जनतेच्या आहेत.
सुरुवातीला ही जागा आरोग्य कर्मचार्‍याच्या प्रशिक्षणासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र कोरोना आल्यामुळे या काळामध्ये राजापूर तालुक्यातील लोकांना वेळेवर उपचार व्हावेत म्हणून लाखो रुपये खर्च करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कोविड उपचार केंद्र म्हणून या इमारतीची पायाभरणी झाली. ३० खाटांच्या कोविड उपचार केंद्रासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सुमारे एका कोटी रुपये या इमारतीसाठी खर्च करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button