“पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा”शुक्रवारी ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ ; मोठ्या संख्येने सहभागी व्हाजिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन

रत्नागिरी, दि. 18 ):- माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून “पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा” हा संदेश घेवून पाणी आणि माती संरक्षणासाठी शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महावॉकेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
वॉकेथॉनचा मार्ग जयस्तंभ ते माळनाका आणि पुन्हा जयस्तंभ (एकूण ३ किलोमीटर) असा आहे. Save Soil, Save Water, Secure Tomorrow या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉनमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, युवक, विद्यार्थी, खेळाडू, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सहभागासाठी https://register.mahaevent.co.in/ या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
पहिल्या पाच विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येणार असून सहभागींना टी-शर्ट व कॅप वितरित करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button