
जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित किल्ले बांधणी स्पर्धातील विजेत्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांचे हस्ते बक्षीस वितरण संपन्न.


जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जैतापुरच्या वतीने सागवे विभागस्तरावर किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नाटे सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री प्रमोद वाघ यांचे शुभ हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितित जि.प. शाळा जैतापुर नं. 1 मध्ये नुकताच पार पड़ला.

अनेक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यात पड़वे येथील कु. अन्वय अमित दीक्षित याने पहिला, कु. दूर्वा ओमकार मांजरेकर (जैतापुर)दूसरी, कु. सान्वी (परी) सच्चिदानंद माजरेकर(जैतापुर)तीसरा, कु. समर्थ स्वप्निल करगुटकर (जैतापुर) उत्तेजनार्थ यांनी धवल यश संपादन केले. यांना रोख रक्कम, ट्रॉफी, सर्टिफीकेट आणि एक झाड श्री. वाघ साहेब यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले.


या समारंभाला मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर,शाळेच्या ग्रामशिक्षण समिती अध्यक्षा सिमरन माजरेकर, मुख्याध्यापक श्री. काम्बळे, सहशिक्षक, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत,सचिव राकेश दांडेकर, सहसचिव प्रसाद माजरेकर, खजिनदार सुनिल करगुटकर, आशासेविका पल्लवी पारकर, संदीप चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते हर्षद माजरेकर, युवा कार्यकर्ते स्वप्निल सोगम,महेश नारकर,परेश भाटकर,अंगणवाड़ी सेविका मंगल बावने, मदतनिस सौ.मांजरेकर, अंगणवाड़ी सुपरवाझर, के.एस. पवार कंपनी सुपरवायजर श्री.अक्षय राठोड, दळेतील सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रभाकर दळवी, पंचायत समिति विशेष शिक्षक श्री.नितेश देवळेकर, शशांक पावसकर, दशरथ चाळके आदी मोठ्या संख़्येने मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.




