
राष्ट्रीय अध्यक्षपदी गुफरान शब्बीर अन्सारी,कार्याध्यक्षपदी फाजीलभाई अन्सारी यांची एकमताने निवड…
मुंबई : ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांचे निधन झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त होती, तसेच चार ते पाच महिन्यांपासून संघटनेचे काम थंडावले होते मुंबई मुसाफिर खाना येथे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभा 16/8/2026, रोजी आयोजित केली होती.
यावेळी लोकशाही पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्षपदी जालन्याचे गुफरान शब्बीर अन्सारी, यांची तसेच कार्याध्यक्षपदी फाजील भाई अन्सारी भिवंडी, यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी नासिक जिल्हाध्यक्ष फारुख भाई बागवान , एडवोकेट अन्सार भाई सय्यद , मनमाडचे फिरोज शेख सद्दाम भाई आत्तार ,मतीन भाई मन्सुरी, यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.
सोलापूरचे महाराष्ट्र अध्यक्ष मुसामुर्शद व प्रवक्ता मिर्झा अब्दुल कयूम मुंबईचे सईद खान, अमीर इद्रीशी खुर्शीद सिद्दीकी, सरफराज अर्जु, निजामुद्दीन राहील, आदींनी मार्गदर्शन केले.
शब्बीर अंसारी यांचे संपूर्ण जीवन ओबीसी समाजासाठी त्याग करून वाहून घेतले होते, तसेच सिने सृष्टीतील अभिनेता दिलीप कुमार यांना सुद्धा आपल्या सामाजिक कार्यात ओबीसी संघटनेत ओढून घेतले होते, अनेक वेळा आंदोलन मोर्चा शासनावर दबाव टाकून मुस्लिम ओबीसी समाजासाठी शासन परिपत्रक काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे ओबीसी समाजातील जात दाखले जात पडताळणी मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी यांना महाराष्ट्र शासन व केंद्र शासनात नोकरीत लागलेले आहेत. तसेच अनेक राजकीय क्षेत्रातील लोकांना ग्रामपंचायत, झेडपी, नगरपालिका, महानगरपालिका, अशा अनेक ठिकाणी नगरसेवकांना मुख्य पदांवर जाता आले.
यावेळी महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी आले होते, औरंगाबादचे मिर्झा अब्दुल कलाम ,परभणीचे सय्यद फारूक, रत्नागिरीचे कमालुद्दीन अहमद कांडेकर, बीडचे शेख जाकीर महबूब , रफिक भाई, नांदेडचे रिजवान भाई कुरेशी, बीडचे इमरान कुरेशी ,सांगोला चे निहाल जहांगीर तांबोळी, औसा जिल्हा लातूर डॉक्टर वाहिद कुरेशी ,पुणे जब्बार भाई शेख, सांगलीचे शहानवाज सौदागर, साताराचे निसारजी मुल्ला, दहिवडी मान मुंशी अहमद सय्यद, चिखली, इब्राहिम बारूद वाला, अहमदपूर लातूर कलीमुद्दीन अहमद, मनमाडचे सद्दामभाई आत्तार, मतीन मन्सुरी, आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन इसाक खडगे यांनी केले.




