
श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत १७ ऑगस्टला कावड यात्रा; भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी : पवित्र श्रावण मासच्या सोमवारी (१७ ऑगस्ट) कावड यात्रेचे आयोजन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे. पवित्र नद्यांचे जल संकलित करून कावड मध्ये भरून काशी विश्वेश्वर महादेवच्या चरणी अर्पण करून यात्रेची सांगता होईल.
ही यात्रा सकाळी ७ वाजता श्री अंबे माता मंदिर मरुधर समाज भवन येथून निघून कुवारबाव – साळवी स्टॉप – आरोग्य मंदिर -मारुती मंदिर -माळ नाका – जय स्तंभ मार्गे राजिवडा येथे श्री काशी विश्वेश्वर मंदिरात पोहोचून यात्रेची सांगता होणार.
यासाठी भारत भूमी तील पवित्र नद्या व पवित्र सरोवराचे जल संकलित करून कांवड पात्र भरले जाणार आहे. कोणाहीकडे असे पवित्र जल असेल त्याने आणून द्यावे किंवा संपर्क करावा. तसेच या धार्मिक यात्रेत रत्नागिरी नगर व परिसरातील सर्व हिंदू बांधव भगिनी यांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




