गुहागर चिखली मांडवकरवाडी येथील मठाजवळ धावणार्‍या एसटी बस केबिनमध्ये शिरला साप


गुहागर चिखली मांडवकरवाडी येथील मठाजवळ सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घटना घडली. पांगरी – गुहागर मार्गावर धावणार्‍या एसटी बसमध्ये अचानक साप शिरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. एसटी प्रवास सुरू असताना बसमध्ये साप आढळून आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या बसचे चालक सचिन चव्हाण व वाहक अभिजित भिडे यांनी प्रसंगावधान पाहून चालक केबिनमध्ये शिरलेल्या सापाला बाहेर काढून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे घेऊन पुढचा प्रवास सुरु केला चालक व वाहक यांनी दाखविलेला प्रसंगावधान याबाबत सर्वत्र कौतुक केले जात आहे. रविवार असल्याने या एसटीमध्ये विद्यार्थी नव्हते. मात्र प्रवासी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना धीर देऊन सापाला बाहेर काढले. अखेर हा साप चालकाजवळील खिडकीतून निघून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button