वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमुळे दरात तफावत, प्रवाशांचात संभ्रम


प्रवाशांना अधिक चांगली, आरामदायी आणि आधुनिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात विविध प्रकारच्या बसेस दाखल केल्या आहेत. मात्र, एकाच महामंडळाच्या सेवेत वेगवेगळ्या प्रकारच्या बसेससाठी स्वतंत्र भाडेदर आणि सवलतींचे वेगवेगळे नियम असल्याने प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बसमध्ये बसल्यानंतर तिकिटासाठी नेमके किती पैसे द्यायचे, कोणत्या बसला कोणती सवलत लागू आहे, याची स्पष्ट माहिती नसल्याने अनेकदा वाहक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
एस्.टी. महामंडळाकडून सध्या साधी बस, निमआराम, विनावातानुकूलित शयन आसनी, विनावातानुकूलित शयनयान, वातानुकूलित शिवशाही, जनशिवनेरी, वातानुकूलित शिवनगरी वातानुकूलित शिवनेरी स्लीपर, ई-बस ९ मीटर तसेच ई-बस १२ मीटर अर्थात ई-शिवाई अशा विविध प्रकारच्या बसेस चालवल्या जात आहेत. या प्रत्येक सेवेसाठ प्रवासभाड्याची स्वतंत्र रचना करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच मार्गावर जाणार्‍या दोन वेगवेगळ्या बसेसचे भाडेही प्रवाशांना वेगवेगळे द्यावे लागते.
सामान्य प्रवाशांना बसस्थानकात बस कोणत्या प्रकारची आहे, याचीमाहिती असली तरी त्या बसचे प्रत्यक्ष प्रवासभाडे किती आहे, याची माहिती अनेकदा सहज उपलब्ध होत नाही. बसमध्ये चढल्यानंतर वाहकाकडून तिकीट घेताना अपेक्षेपेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवासी आणि वाहक यांच्यात खटके उडतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button