कुवारबाव येथे तीन डंपरचा विचित्र अपघात; ब्रेक फेल झाल्याने धडकांची मालिका


रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव येथे मंगळवारी सकाळी तीन डंपरचा विचित्र अपघात झाला. एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या डंपरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने जोरदार धडक बसली. धडकेनंतर संबंधित डंपर मागे सरकल्याने पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या डंपरलाही धडक बसली.

कुवारबाव येथे डंपर क्रमांक एमएच ०८ डीडी ७७९४ हा एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी चालक अमीन रेड्डी यांच्या ताब्यातील एमएच ०८ एपी २६३७ या डंपरचे अचानक ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे या डंपरने पुढे थांबलेल्या डंपरला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर एमएच ०८ एपी २६३७ हा डंपर मागे सरकला आणि पाठीमागून येणाऱ्या एमएच ०८ डब्ल्यू २९०० या तिसऱ्या डंपरलाही धडक बसली. या अपघातात तिन्ही डंपरचे नुकसान झाले.

सुदैवाने या विचित्र अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, अपघातामुळे कुवारबाव परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button