शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी प्रवासातील गैरसोयी दूर करा भाजप शहर मंडळचे एसटी महामंडळाला निवेदन


शाळा सुटण्याच्या वेळेनुसार सायंकाळी जादा बसफेऱ्या सोडण्याची दादा ढेकणे यांची मागणी चालक-वाहकांकडून गैरवर्तन झाल्यास कारवाईचे आश्वासन


रत्नागिरी शहरातून आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना एसटी बससेवेमुळे होणाऱ्या विविध गैरसोयींची दखल घेत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडलाच्या वतीने एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले

भाजपा शहराध्यक्ष श्री. परशुराम (दादा) ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली

शहरातील अनेक शाळा सायंकाळी ५.३० वाजता सुटतात मात्र आजूबाजूच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक एसटी बसेस त्यापूर्वीच साधारण ५ वाजताच्या सुमारास निघून जातात त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील बसची वाट पाहत तासन्तास थांबावे लागते त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे

निवेदनामध्ये बस रिकामी असतानाही काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बस थांबवली जात नाही बसमध्ये चढताना उतरताना पुरेसा वेळ दिला जात नाही तसेच काही वेळा या बसमध्ये पास चालत नाही असे सांगून विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो अशा तक्रारी मांडण्यात आल्या परीक्षा कालावधीतही विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिला

तसेच एसटी बसचे चालक किंवा वाहक यांच्याकडून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन अरेरावी किंवा नियमबाह्य पद्धतीने वागणूक दिली जात असल्यास त्याची तातडीने दखल घेण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. यावर विभाग नियंत्रकांनी चालक अथवा वाहकांकडून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याची तक्रार आल्यास संबंधितांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन भाजपा शिष्टमंडळाला दिले

काही बसफेऱ्यांमध्ये कमी प्रवासी असतानाही बसेस धावत असल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळांच्या वेळांचा योग्य मेळ घालून बससेवेचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यासोबतच एसटी महामंडळालाही अधिक प्रवासी मिळू शकतात असा मुद्दा भाजपा शिष्टमंडळाने मांडला

भाजपाच्या प्रमुख मागण्यांमध्ये सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत आजूबाजूच्या ग्रामीण भागांसाठी जादा एसटी फेऱ्या सोडाव्यात शालेय विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करावे यांचा समावेश आहे

विभाग नियंत्रकांनी शिष्टमंडळाचे म्हणणे सविस्तर ऐकून घेत विद्यार्थ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या प्रश्नाचा पुढील पाठपुरावा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वेळेला सुरक्षित प्रवासाला आणि त्यांच्या सन्मानाला प्राधान्य देऊन एसटी प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button