आंबोलीत आलेल्या एका पर्यटकाचा पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत बुडून मृत्यू


आंबोलीत आलेल्या एका अतित्साही पर्यटकाचा येथील सतिचीवाडीतील पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत बुडून मृत्यू झाला असून, संजय लक्ष्मण गावकर (५० रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) यांचा बुडून मृत्यू झाला.ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. ६ दिवसांत वेगवेगळ्या ३ घटनांमध्येे ३ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

सावंतवाडी – माजगाव उद्यमनगर येथील खासगी एका कंपनीत काम करणारे मिळून १३ जण सावंतवाडी – माजगाव आणि इन्सुली आदी परिसरातून आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आले होते. एका चिरेखाणी जवळ सदर ग्रुपने पार्टी केली. काहीजण चिरेखाणीत अंघोळ करण्यासाठी गेले होते. संजय गावकर यांनी देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडत होते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपयश आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button