
पश्चिम रेल्वेही गणेशभक्तांच्या दिमतीला धावली
मध्य रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी २४६ फेर्या जाहीर करत कोकणवासियांना दिलासा दिलेला असतानाच पश्चिम रेल्वेही गणेशभक्तांच्या दिमतीला धावली आहे. गणेशोत्सवात ८ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरातील कोकणवासियांना गाव गाठताना करावी लागणारी यातायात थांबणार आहे.
खेड : ०९०१३/०९०१४ क्रमांकाची मुंबई सेंट्रल-ठोकुर स्पेशल १५ सप्टेंबर रोजी धावेल. मुंबई सेंट्रल येथून सकाळी १०.४५ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठोकुर येथे पोहोचेल. परतीला सकाळी ११ वाजता सुदून दुसर्या दिवशी सकाळी ७.४० वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. ०९०१९/०९०२० क्रमांकाची मुंबई सेंट्रल-सावंतवाडी स्पेशल ११, १२, १३, १६, १८, १९, २०, २३ सप्टेंबर दरम्यान धावेल मुंबई सेंट्रल येथून सकाळी १०.४५ वाजता सुटेल. ०९०३५/०९०३६ क्रमांकाची वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी साप्ताहिक स्पेशल १७ व २४ सप्टेंबर रोजी धावेल. वांद्रे टर्मिनस येथून दुपारी २.२० वाजता सुटेल. रत्नागिरी येथून मध्यरात्री १.३० वाजता सुटेल ०९११४/०९११३ क्रमांकाची बडोदर-रत्नागिरी स्पेशल १५ सप्टेंबर रोजी धावेल. वडोदरा येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल. ०९११०/०९१०९ क्रमांकाची विश्वामित्री रत्नागिरी स्पेशल १२, १६, १९, २३ सप्टेंबर रोजी धावेल विश्वामित्री येवून सकाळी १० वाजता सुटेल. ०९१२४/०९१२३ क्रमांकाची विश्वामित्री रत्नागिरी १४ व १८ सप्टेंबर रोजी द्यावेल स्पेशल विश्वामित्री येवून सकाळी ९.५५ वाजता सुटेल ०९०२२/०९०२१ क्रमांकाची उथना-त्नागिरी स्पेशल १७ व २४ सप्टेंबर रोजी धावेल उथना पेथून सकाळी ८ वाजून ५ – मिनिटांनी सुटेल ०९०३०/०९०२९ क्रमांकाची कलगाड रत्नागिरी स्पेशल १४ सप्टेंबर रोजी यावेत वलसाड येथून दुपारी २.५० वाजता सुटेल. या स्पेशल गाडयाम्मूळे मुंबई उपनगरातील बोरिवली भाईंदर विरार वास्तव्यास कोकणतासियांना मोठा दिला मिळाला आहे.




