
कवी राष्ट्रपाल सावंत यांच्या ’गतस्मृतीचा गजबज’ला ’रत्नसिंधू साहित्य सन्मान’ जाहीर
लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे उपाध्यक्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी लिहिलेल्या ’गतस्मृतीची गजबज’ या पुस्तकाला यंदाच्या रत्नसिंधू कला मंच कोकण विभाग महाराष्ट्रचा साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी ज्येष्ठ साहित्यिक अजय कांडर यांच्या हस्ते मान्यवर पांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावचे सुपुत्र असलेले कवी, लेखक, शाहीर, समिक्षक राष्ट्रपाल सावंत यांनी आपल्या ’गतस्मृतीची गजबज’ पुस्तकात कोकणातील सामाजिक वास्तव, जीवन संघर्ष, विविध अनुभव, घटना प्रसंग आणि त्यातून उमटणारी जीवन मूल्ये याचे अत्यंत प्रभावी ओघवत्या आणि संवेदनशील शैलीत चित्रण केले आहे. त्यांच्या गतस्मृतींची गजबज समाजाभिमुख विचार, लेखनातून प्रेरणादायी जीवनमूल्याचा संदेश व्यक्त झाला असून हे पुस्तकं सर्व स्तरात्तील वाचकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याच्या भावना ज्यष्ठी साहित्यिकांनी व्यक्त केल्या आहेत. या उल्लेखनीय साहित्य निर्मितीची दखल घेऊन रत्नसिंधू कोकण विभाग कला मंचाने साहित्य सन्मान पुरस्कार त्यांना जाहिर केला आहे.




