महामार्गावरील अतिक्रमणे हटवणार


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे लवकरच जमीनदोस्त होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने चिपळूण येथील ३५ व्यावसायिकांना अंतिम नोटीस दिली असून तातडीने अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पॉवरहाऊससह अन्य भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने अपघात घडत असल्याने याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून चिपळुण शहरासह ग्रामीण भागात महामार्गाच्या गटारावरील अतिक्रमण वाढले आहे. टपर्‍यांपासून अगदी चायनिज सेंटर, हॉटेल, भाजीची दुकाने अनेकांनी थाटली आहेत. त्यामुळे त्यांच्या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक काही भागात सर्व्हिसरोड तर काही ठिकाणी चक्क महामार्गावर वाहने उभी करतात. शहरातील याचे पॉवरहाऊस परिसरात प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथे सातत्याने पुढील वाहने न दिसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अतिक्रमणे हटवण्याची मागणी महामार्गाच्या गटारांवर झालेली अतिक्रमणे तोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरिक करत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग नोटिसा देण्यापलीकडे काहीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नाराजी असतानाच आता या विभागाने ३५ व्यावसायिकांना अंतिम नोटीस दिली असून त्यांची अतिक्रमणे तातडीने काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. येत्या महिनाभरात संबधितांनी अतिक्रमणे न काढल्यास ती तोडली जाणार असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button