
लोकजागृती फाउंडेशन, जिल्हा शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
माझं गाव आरोग्य संपन्न गाव मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री जन आरोग्य शिबीरा तील एक भाग म्हणून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गणपतीपुळे येथे आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न. शिबिरात 20 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व रक्तदाते, सहकार्य करणाऱ्या संस्था व नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
गणपतीपुळे येथील एमटीडीसी (MTDC) कार्यालयात लोकजागृती फाउंडेशन रत्नागिरी, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ गणपतीपुळे कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात 20 नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले, तर ४८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे नियोजन लोकजागृती फाउंडेशनचे संस्थापक तथा प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचे आरोग्य निरीक्षक डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या माध्यमातून करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. आशिष खांडेकर, डॉ. अॅलिस डेव्हिड, अधिपरिचारक गणेश मोरे, PRO प्रणाली आचरे, रक्तपेढी तंत्रज्ञ कृतिका राऊत, मदतनीस प्रमोद चाटे, साईदीप बारगुडे, प्रीतम भोसले, तसेच एमटीडीसीचे अधिकारी श्री. वैभव पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार, डॉ. ऋषिकेश डोके तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनीही शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एमटीडीसी कार्यालयाचे सहकार्य, रक्तदाते आणि उपस्थित नागरिकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.




