
माई ह्युंदाई, रत्नागिरीतर्फे आषाढी एकादशी निमित्त ‘भक्तीरंग’ कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त माई ह्युंदाई, रत्नागिरी यांच्या वतीने ‘भक्तीरंग’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अभंग व भक्तीगीतांच्या सुरम्य मैफलीसह रसिकांच्या मनाचा आनंद वाढवणारा ठरेल.
या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील पारंपारिक अभंग, भजन आणि भक्तीगीतांचा मेळा सादर केला जाणार आहे. भक्ती रसाने ओथंबलेल्या या कार्यक्रमात श्रोत्यांना आध्यात्मिक अनुभूती मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमात रत्नागिरी येथील उदयोन्मुख गायक आदित्य लिमये हे स्वरसाज चढवणार आहेत. यांना तबला केदार लिंगायत, पखवाज पुष्कर सरपोतदार, आॕर्गन महेश दामले, व्हायोलिन उदय गोखले, तालवाद्य प्रथमेश घाटे साथ करणार आहेत. या सुश्राव्य कार्यक्रमासाठी दिप्ती आगाशे यांचं निवेदन असेल.
या कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे म्हणाले, “आम्ही केवळ वाहन व्यवसायच करत नाही, तर समाजातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाला बळकटी देण्याचे कामही करत आहोत. आषाढी एकादशीसारख्या पावन प्रसंगी ‘भक्तीरंग’ सारख्या कार्यक्रमाद्वारे आम्ही भक्ती आणि संस्कृतीचा जागर करत आहोत. माई ह्युंदाईच्या मिरजोळे येथील शोरूम मध्ये हा कार्यक्रम होणार असून यासाठी जास्तीतजास्त रत्नागिरीकर रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे




