दापोली तालुक्यातील आंजर्लेत जप्त वाळू रातोरात गायब


दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदर परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या असून, महसूल विभागाने पंचनामा करून जप्त केलेली वाळूच दुसर्‍याच दिवशी रातोरात चोरी करून विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वाळूमाफियांची मुजोरी किती वाढली आहे, याचे ज्वलंत उदाहरण समोर आले असून, महसूल यंत्रणेलाच उघड आव्हान दिले जात असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. ११ जुलै रोजी आंजर्ले तरीबंदर येथे महसूल विभागाने कारवाई करत बेकायदेशीररीत्या उपसा केलेली सुमारे पाच ब्रास वाळू जप्त केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button