“रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद

“रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे.

ग्रीन स्टील, सी-प्लेन, शिपयार्ड आणि सीएनजी यांसारखे दूरदृष्टीचे प्रकल्प जिल्ह्यात आणून त्यांनी रत्नागिरीच्या विकासाला नवे दालन खुले करून दिले आहे. सुमारे ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे ही मोठी कामगिरी असून, यामुळे रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. उद्योग, पर्यटन आणि हरित ऊर्जेचा समन्वय साधत जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता या प्रकल्पांमध्ये आहे. ना. उदय सामंत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रत्नागिरीला राज्याच्या औद्योगिक नकाशावर अधिक भक्कम स्थान मिळेल, असा विश्वास आहे. जिल्हा फेडरेशनच्या वतीने त्यांच्या या विकासाभिमुख भूमिकेचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे.”
डॉ. प्रशांत पाटवर्धन
अध्यक्ष
फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button