
विजेचा शॉक लागून एका निष्पाप जनावराचा मृत्यू
गुहागर )
गुहागर तालुक्यातील मुंढर ओळवण वाडी येथे काल संध्याकाळी महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप जनावराला आपला जीव गमवावा लागला आहे. माळरानावर चरत असलेल्या एका गायीचा ११ केव्ही वीज वाहिनीच्या पोलच्या वायरमुळे शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
मुंढर ओळवण वाडी परिसरातील माळरानावर काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे गुरे चरत होती. याच दरम्यान तेथून गेलेल्या ११ केव्ही वीज वाहिनीच्या पोलला असणारी गार्ड वायर तुटून जमिनीला टेकलेली होती. दुर्दैवाने चरत असलेली गाय या वायरच्या संपर्कात आली. या वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने गायीला विजेचा तीव्र धक्का लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.महावितरणच्या या अत्यंत गंभीर निष्काळजीपणामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलची गार्ड वायर जमिनीला टेकलेली असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा संतप्त सवाल आता स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पीडित शेतकऱ्याला तातडीने भरपाई देण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे .




