
सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार यांचे खेड येथे जंगी स्वागत.
महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री सन्मा अँड.आशिष शेलार यांचे खेड रेल्वे स्थानकावर भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून कोकणच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन जाखडी नृत्याने जंगी स्वागत करण्यात आले
कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या जाखडी नृत्य या पारंपरिक लोककलांना राज्य शासनाच्या लोककला अनुदान योजनेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अँड.आशिष शेलार यांचे आपल्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान करीत स्वागत केले.
सदर वेळी भाजपा आमदार प्रमोद जठार, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, दापोली महिला तालुका अध्यक्षा जया साळवी, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, स्वराज गांधी, अनिकेत पवार, राधेश्याम वर्मा, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




