भाजपा आमदार प्रमोद जठार यांची लोटे एमआयडीसीतील स्थानिक उद्योजक- कारखानदारांसोबत आढावा बैठक


खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथे स्थानिक उद्योजक आणि कारखानदारांसोबत भाजपा आमदार प्रमोद जठार यांची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.


गेल्या काही काळात येथील उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बैठकीत प्रामुख्याने एमआयडीसी परिसरातील अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठ्याचा गंभीर होत चाललेला प्रश्न, उद्योगांच्या विस्तारात आणि दैनंदिन कामकाजात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी या सर्व विषयांवर अत्यंत सविस्तर चर्चा झाली.
उद्योजकांशी संवाद साधताना आमदार जठार यांनी “मीच तुमचा पालक आमदार आहे” या एकाच वाक्यात आश्वस्त केले. या वेळी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, स्वराज गांधी, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले, यांच्यासह स्थानिक उद्योजक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button