रत्नागिरी तायक्वादो स्पोर्ट्स असोसिएशन आणि संगमेश्वर

तालुका तायक्वादो अकॅडमी व नगर पंचायत देवरुख तायक्वादो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वादो क्युरोगी व पूमसे स्पर्धा दिनांक 10 ते 12 जुलै 2026 रोजी ओमेगा गार्डन हॉल देवरुख येथे पार पडली. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील 30 खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच राजापूरचे प्रतिनिधित्व करत 9 सुवर्णपदक,७ रोप्यपदक व ४ कांस्यपदक कमाई केली. याचबरोबर गत नऊ वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी ही राजापूर तालुक्यातील तीन खेळाडू बेस्ट फायटरचे मानकरी ठरले. यामध्ये सब जुनिअर गटात श्वेत मुकेश नाचरे,
कॅडेट गटात नक्ष परशुराम पवार, ज्युनियर गटात परी संजय जड्यार यांनी हा किताब पटकावला .
विविध गटात झालेल्या या स्पर्धेत
सुवर्णपदक विजेते खेळाडू
आभा प्रभाकर मापेलकर, श्वेत मुकेश नाचरे, नक्ष परशुराम पवार, शुभ्रा विवेक गुरव, परी संजय जड्यार, गार्गी संजय बाकाळकर, रिया मुकेश मयेकर, पूर्वा संदीप राऊत, अंश राजन गुंडये
रौप्य पदक विजेते खेळाडू
मृदुला मोहन घुमे, वेदांत नरेश रहाटे, प्रांजली अजित चव्हाण, मिताली मोहन घुमे, तीर्था गणेश चिपटे, अनुष्का अनिल बाणे, गौरव दीपक धालवलकर
कांस्यपदक विजेते खेळाडू
अर्चित प्रभाकर मापेलकर, हाऊबाई बालाजी जाधव, यज्ञेश जगदीश पेनकर, साईश कमलेश जाधव
सहभागी खेळाडू
निहाल नितीन आंबेरकर, हृदया नवनीत शिंदे, स्वामिनी अजित चव्हाण, यश सचिन चव्हाण, युवराज मंदार पेनकर, द्रोण संदीप चव्हाण, काव्या प्रसाद शिवलकर, वेदिका सुरेश मांडवे,
या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.
विजेत्या खेळाडूंना तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश राव कर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button