मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात इयत्ता तिसरी आणि चौथी पुनर्रचित अभ्यासक्रम उर्दू माध्यम शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अन्वये इयत्ता तिसरी आणि चौथी च्या प्रशिक्षण पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण उर्दू माध्यमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या वतीने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन पवित्र कुराण पठण व प्रार्थनेने झाले. यावेळी प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, प्राचार्य श्री. सुशिल शिवलकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी, वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती दीपा सावंत, श्री मुनाफ गुहागरकर समन्वयक व केंद्रप्रमुख, तज्ञ मार्गदर्शक श्रीमती रुबिना नाईक, श्रीमती करीना वागळे, श्री. अकरम पठाण आणि विषय सहाय्यक समन्वयक श्रीमती खालिदा जमादार, श्रीमती देवयानी पवार उपस्थित होत्या.
उद्घाटनपर भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन या अभ्यासक्रमाविषयी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रमाणे कौशल्य आधारित अभ्यासक्रम विषयी प्रशिक्षणार्थींना माहिती दिली .
या प्रशिक्षणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ७५ उर्दू माध्यम शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षणासाठी परिषद दालन, वर्गखोल्या, निवास व्यवस्था तसेच अन्य आवश्यक सुविधा मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात उपलब्ध करून देण्यात आल्या. काही प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे करण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळून अध्यापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमधील समन्वय वाढून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button