
बोडस चॅरिटेबल ट्रस्टने वर्धापन दिनानिमित्त सतरा महिला स्टेशन मास्तरांचा सन्मान
बोडस चॅरिटेबल ट्रस्टने वर्धापनदिनाचे औचित्य साधून यंदा कोकण रेल्वेच्या एकूण १७ महिला स्टेशन मास्तरांना विशेष कार्यसन्मान पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. रेल्वेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे एखाद्या अशासकीय संस्थेकडून महिला स्टेशन मास्तरांचा सत्कार होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
१७ महिला स्टेशन मास्तरांमध्ये सनिषा हरिश्चंद्र तटकरी (कळंबणी बुद्धेक् स्टेशन), अस्मिता तुकाराम सावंत (खेड), श्रद्धा समीर चिले (खेड), शिल्पा शंकर दमके
(चिपळूण), निकिता नीलेश पवार (कडवई), अनघा राजाराम नाटेकर (रत्नागिरी), चैताली राजेंद्र कल्याणकर (रत्नागिरी), प्राजक्ता प्रदीप कांबळे (खारेपाटण), अंजली श्रीराम चाळके, (नांदगाव), मनस्वी सुभाष कदम (नांदगाव), विशाल दिनेश बेटकर (कणकवली), रंजना दीपक माने (कणकवली), सुविधा इमान्वेल स्वामी (सिंधुदुर्ग), मेघा कमळाकर नागवेकर (सिंधुदुर्ग), सी. प्रज्ञा भालचंद्र नाईक (झाराप), अनुराधा रितेश पवार (सावंतवाडी) आणि प्रतीक्षा लक्ष्मण गावकर (मडुरे) यांचा समावेश आहे.
महिला सक्षमीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून हा सन्मान केला जात असून, सेवाकाळात या महिला स्टेशन मास्तरांनी दाखवलेले प्रसंगावधान, चाकोरीबाहेर जाऊन केलेले प्रवाशांचे रक्षण, चुकलेल्यांची कुटुंबियांशी करून दिलेली पुनर्भेट, रोखलेल्या संभाव्य दुर्घटना आणि कसोटीच्या प्रसंगी दाखवलेले धैर्य व तत्परता याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा टस्टच्या आयोजित करण्यात आला आहे. बोडस चॅरिटेबल कार्यक्षेत्रातील दिवाणखावटी ते मडुरे या २६ स्थानकांपैकी १७ स्थानकावेर कार्यरत महिला स्टेशन मास्तरांना व्यक्तिगत सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक देऊन गौरवण्यात येणार आहे. या सन्मानासाठी ३१ मे २०२६ अखेर कार्यरत महिला स्टेशन मास्तर हा एकच निकष लावण्यात आला होता. ७ महिला स्टेशन मास्तर रत्नागिरी जिल्ह्यात, तर १० महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ दिला जाणार नाही. या उपक्रमासाठी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट आणि जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी विशेष सहकार्य केले आहे.




