मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ८ व ९ जुलैरोजी किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद


हवामान विभागाने महाड तालुक्यासह परिसरासाठी पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून ८ आणि ९ जुलै रोजी किल्ले रायगडावर जाणारे नाणे दरवाजा व चित्त दरवाजा हे दोन्ही पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी पोपटराव ओमासे यांनी जारी केले आहेत.मुसळधार पावसामुळे किल्ला परिसरात दरड कोसळणे, माती घसरणे आणि अन्य नैसर्गिक धोके निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात दरवर्षी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर भेट देत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button