रघुवीर घाट (ता.खेड, जि.रत्नागिरी) यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची आमदार प्रमोद जठार मागणी

मुंबई, दि. ७ जुलै : आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन रघुवीर घाट (ता.खेड, जि.रत्नागिरी) यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

निवेदनात घाटाचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण, संरक्षक भिंती, रिटेनिंग वॉल, सुरक्षित कठडे, तसेच व्ह्यू पॉइंट, पार्किंग, स्वच्छतागृहे व इतर पर्यटन सुविधा विकसित करण्याची मागणी करण्यात आली.

यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागामार्फत प्रस्तावाची सकारात्मक दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button