
लोकमान्य टिळक जन्मस्थानमराठी भाषा विभागातर्फे पुस्तक दालनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन


रत्नागिरी, दि. 5 ) : येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनातर्फे ग्रंथ भेट देऊन उभारण्यात आलेल्या पुस्तक दालनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. सामंत यांनी लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर कोनशिलेचे अनावरण करुन आणि फित कापून पुस्तक दालनाचे उद्घाटन केले.


मराठी भाषा विभागातर्फे या दालनाला चरित्र, बालसाहित्य, ऐतिहासिक, माहितीपट, कविता संग्रह, लेख संग्रह अशी विविध 1 हजाराहून अधिक पुस्तके वाचनाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या वास्तूला भेट देणाऱ्या पर्यटकांना, विद्यार्थ्यांना पीएचडीचा अभ्यास करणाऱ्यांना, युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय या विद्यार्थ्यांसाठी येथे अभ्यासिका, पीएचडी, संशोधनात्मक अभ्यासक्रम आणि पत्रकारिता प्रशिक्षण सुरु करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले.



या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर,
नगरसेविका स्मिता पावसकर, वैभवी खेडेकर, प्रिती सुर्वे, पूजा पवार, भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, राजेंद्र महाडीक आदी उपस्थित होते.
000




