
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यात दुसर्या क्रमांकावर, उपाध्यक्ष बाबाजी जाधव
जिल्ह्यात स्वर्गीय गोविंदराव निकम यांनी सहकार रुजवण्यात मोठे योगदान दिले. त्यानंतर डॉ. चोरगे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली कठीण परिस्थितीतून मार्ग काढत जिल्हा बँकेला राज्यात दुसर्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच सहकार खर्या अथनि ग्रामीण भागात पोहोचला आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी केले.
केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त मराठा भवन येथे मंगळवारी विशेष सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि व्यवसाय वृद्धी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शरद पवार आणि शहा यांच्या योगदानाचा उल्लेख केंद्रात सहकार कायद्याला नवे रूप दिल्यानंतर, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अनेक सकारात्मक
निर्णय घेतले जात असल्याचे मार्गदर्शन करताना उपाध्यक्ष जाधव यांनी सांगितले. तसेच, केंद्रात शरद पवार मंत्री असताना त्यांनी कृषी व सहकार क्षेत्रासाठी केलेले मोठे काम कोकणात सहकार रुजवण्यासाठी फायदेशीर ठरले. नाबार्ड, आरबीआय आणि सहकार विभागाकडून होणार्या लेखापरीक्षणात (ऑडिट) जिल्हा बँकेचे कामकाज नेहमीच अव्वल ठरले आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांत ही बैंक अग्रेसर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच मेळाव्याचे औचित्य साधून ३० जून रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असलेले जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचा जिल्हा बँक व अन्य सहकारी संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.




