
मुंबई-गोवा महामार्गावर आरवली येथे कंटेनरचा अपघात; वाहतूक काही काळ विस्कळीत
: मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे गुरुवारी कंटेनरचा अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघातामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक संथ गतीने सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महामार्ग प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.




