
चिपळूण नगरपरिषदेत विरोधी गटाच्या १२ नगरसेवकांना बसण्यासाठी केवळ तीनच खुर्च्या
चिपळूण नगरपरिषदेत विरोधी गटाच्या १२ नगरसेवकांना बसण्यासाठी केवळ ३ खुर्च्यांची व्यवस्था आहे. जागा नसल्याचे कारण देत त्यांच्यावर ही वेळ आणण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कॉंग्रेसचे नगरसेवक २९ पासून नगरपरिषद कार्यालय परिसरात खुर्य्या टाकून बसणार आहेत.
नगरपरिषदेत भाजप-शिंदे शिवसेनेची सत्ता आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ महायुतीचे आहेत. मात्र निवडणूक झाल्यापासून त्यांच्या कामाची पद्धत पाहता आपले स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सर्वच नगरसेवकांना बरोबर घेऊन काम करताना दिसत आहेत. नगरपरिषदेची एक इमारत पाडण्यात आली असून सध्या एकाच इमारतीत राजकीय व प्रशासकीय कारभार सुरू आहे. सत्ताधारी पक्षांच्या सभापतींनी पूर्वीच्या जागीच आपली चांगली दालने केली आहेत. त्यामुळे त्या-त्या पक्षाच्या नगरसेवकांना तिथे बसण्याची व्यवस्था आहे.
कॉंग्रेस, मात्र जागेअभावी अजित पवार राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या विरोधी पक्षांच्या १२ नगरसेवकांना नगरपरिषदेत बसण्यासाठी केवळ तीन खुर्च्य ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांना टेबलवर बसण्याची वेळ येत असून काहींना उभेच राहावे लागते.www.konkantoday.com




