पानवल धरण तयार; पण पाईपलाईनअभावी तहान कायम.


रत्नागिरी शहराला पुढील अनेक महिन्यांसाठी नैसर्गिक उताराने पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पानवल धरणाच्या योजनेला पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला आहे. धरणाचे मजबुतीकरण आणि गाळ काढण्यावर तब्बल १६ कोटी रुपये खर्च करूनही अद्याप उर्वरित सुमारे दोन किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण न झाल्याने शहरवासीयांना या धरणाचे पाणी यंदाही मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालिकेकडून अन्वी कंपनीच्या ठेकेदाराचे सुमारे दोन कोटी रुपये देणे बाकी असल्याने ठेकेदाराने काम थांबविले होते. ’थकीत रक्कम मिळाल्याशिवाय पुढील काम सुरू करणार नाही, अशी भूमिका ठेकेदाराने घेतल्याने महत्त्वाची पाईपलाईन रखडली होती. त्यानंतर उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत आणि आ. किरण सामंत यांनी मध्यस्थी करून ठेकेदाराला काम पुन्हा सुरू करण्यास तयार केले. आवश्यक पाईपही मागविण्यात आले आणि कामाला सुरुवात झाली. मात्र, त्याचवेळी पावसाने जोर धरल्याने काम पुन्हा अडचणीत आले आहे.
पानवल धरणापासून नाचणे येथील मुख्य जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एकूण सुमारे १२ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे नियोजन होते. मात्र सुधारित पाणीपुरवठा योजनेत केवळ १० किलोमीटरच काम समाविष्ट करण्यात आले होते. ते पूर्ण झाले असले तरी उर्वरित दोन किलोमीटरसाठी स्वतंत्र साडेतीन कोटी रुपयांचे निविदा काम काढण्यात आले. त्याच अंतर्गत शीळ धरण ते जॅकवेल आणि पानवल येथील उर्वरित पाईपलाईनचे काम होणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button