प्रभाग क्रमांक १५ मध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद


राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १५ येथे आज लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली
प्रभाग क्रमांक १५ मध्ये एकूण ९३ बालकांची नोंद असून सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले
या मोहिमेची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. वर्षा ढेकणे पदाधिकारी विक्रम जैन तसेच सुरेंद्र लांजेकर यांनी भेट देऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन करत एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहू नये असे सांगितले पोलिओमुक्त भारताच्या निर्मितीसाठी शासनाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे असेही त्यांनी नमूद केले

आरोग्य विभागाच्या अधिकारी परिचारिका आणि आशा सेविकांनी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालकांच्या आरोग्याबाबत जागरूकता दाखविल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button