
कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, मात्र धरणातील साठा अद्यापही कमी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाने नवजा येथे मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शंभर मिली मीटरचा टप्पा पार केला आहे. कोयनानगर येथे पडत असलेल्या पावसाने शंभरीचा उंबरठा गाठला असून महाबळेश्वर येथे पडत असलेल्या पावसाची शतकाकडे वाटचाल आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असला तरी कोयना जलाशयात अद्याप पाण्याची आवक सुरु झाली नसल्याने कोयना धरणातील साठा सातत्याने कमी होत आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कोयना जलाशयात ८.६९ टीएमसी पाणीसाठा होता.
www.konkantoday.com




