महामार्ग वृक्ष लागवडीसाठी’ ९० टक्के खड्डे तयार, शाखा अभियंत्यांची माहिती


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या परशुराम ते खेरशेत या चिपळूण टप्यात वृक्ष लागवडीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लागवडीसाठी करण्यात येणारे खड्डे खोदण्याचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या एक-दोन दिवसांत खड्ड्यांमध्ये खत टाकून वृक्ष लागवडीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता शाम खुणेकर यांनी मंगळवारी वृक्षलागवड पदाधिकार्‍यांना दिली. हक्क समिती मंगळवारी वृक्ष लागवड समितीच्या पदाधिकार्‍यांनी शाखा अभियंता शाम खुणेकर यांची भेट घेऊन महामार्गावरील वृक्ष लागवड कामाचा आढावा घेतला. यावेळी परशुराम ते खेरशेत या टप्प्यात पर्यावरण संवर्धन आणि हरित पट्टा निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button