अखेर ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ सक्सेस, एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी सोमवारी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर बोलताना शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर आता फुलप्रूफ सक्सेस झालं आहे’ अशी घोषणा करत नव्या खासदारांच्या सन्मानाची आणि त्यांच्या मतदारसंघांच्या विकासाची हमी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदे गटात प्रवेश केलानव्या खासदारांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या परिवारात सहा नवीन खासदार सामील झाले आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न असोत किंवा राज्यातील विकासकामे, या खासदारांच्या मतदारसंघातील कोणतेही काम अडवले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिलीभाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व खासदारांचे वैयक्तिकरित्या कौतुक केले. संजय दिना पाटील हे जनतेशी जोडलेले आणि कार्यकर्त्यांचा कैवारी असल्याचे त्यांनी सांगितले. ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख करताना, त्यांना काही जणांनी ‘रील स्टार’ म्हटलं, पण ते ‘रिअल स्टार’ आहेत, असे शिंदे म्हणाले. संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कामाचाही त्यांनी गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button