सार्वजनिक ठिकाणी दारु पिणार्‍या संशयितांवर गुन्हा


सार्वजनिक ठिकाणी दारु पिणार्‍या चौघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुरुवारी सायंकाळी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. विलास दिलीप गुरव (३५, रा. नाणीज गुरववाडी), मोहसिन मोईद्दीन मंगोली (३०, रा. मुरुगवाडा, झोपडपट्टी), सुरेश बाबू ठोंबरे (६५, रा. कोतवडे सनगरेवाडी) व मंदार रमाकांत तळेकर (२४, रा. गोळप, धोपटवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
विलास गुरव हा साठरेबांबर तेरेकडवाडी जाणार्‍या रस्त्याकडेला, मोहसिन हा मुरुगवाडा पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी, सुरेश ठोंबरे हा कोतवडे- सनगरेवाडी कडे जाणार्‍या रस्त्याकडेला तर मंदार तळेकर हा निरुळ पावस ते सापुचेतळे जाणार्‍या रस्त्याकडेला दारु पिण्यासाठी बसला असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार चारही संशयितांवर पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button