
कोकण मार्गावर धावणार्या तेजस एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणात घसरण, प्रवाशांच्यात नाराजी
कोकण मार्गावर धावणार्या तेजस एक्स्प्रेसच्या प्रतिष्ठेसह वक्तशीरपणात घसरण झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. सात महिन्यात सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेसच्या १४२ पैकी ६४ फेर्याच निर्धारित वेळेत धावल्या. प्रतिष्ठेसह सेवा दर्जात झालेली घसरण यामुळे अनेक प्रवाशांनी प्रवास करताना नाके मुरडली. प्रिमियम दर देऊन वक्तशीरपणासह अन्य सुविधा मिळत नसतील, तर जास्त पैसे कशासाठी मोजायचे, असा प्रश्न रेल्वे अभ्यासक श्रेयस पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.
२०१७ मध्ये कोकण मार्गावर सुरू झालेली सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस ही गाडी प्रिमियम गाडी मानली जाते. २२११९/२२१२० क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस मंगळवार, बुधवार, शुक्रवारी, शनिवार व रविवारी धावत होती. आता पावसाळी वेळापत्रकानुसार आता बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी तीनच दिवस धावणार आहे. कोकण मार्गावर धावणार्या तेजस
एक्स्प्रेसच्या वेळेत सातत्याने होणारा विलंब या सुविधांमुळे प्रवाशांना मनस्तापच सहन कराया लागत आहे.www.konkantoday.com




