
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत फ्रान्स दौर्यात सकारात्मक चर्चा झाल्याचा अधिकार्यांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा यांच्या सध्या सुरू असलेल्या फ्रान्स दौर्यात जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत एकदा महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. फ्रान्समधील नीस शहरात पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात पार पडलेल्या द्विपक्षीय बैठकीमध्ये नागरी अणुऊर्जा सहकार्याचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला. या बैठकीनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी विशेष पत्रकार परिषदेत प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली.
या प्रकल्पाची पार्श्वभूमी अतिशय ऐतिहासिक आणि प्रदीर्घ राहिलेली आहे. २००८ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक नागरी अणुकराराच्या पार्श्वभूमीवर, भारतं आणि फ्रान्स यांच्यातही धोरणात्मक अणुऊर्जा सहकार्य करार झाला होता. या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.
www.konkantoday.com




