कुवारबाव उड्डाण पुलासाठी माती परीक्षणाचे काम प्रगतीपथावर


मिर्‍या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणात बाधित होणार्‍या कुवारबाव बाजारपेठेचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. येथे उभारल्या जाणार्‍या १०० कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळाली आहे. पुलाच्या उभारणीसाठी लागणार्‍या तांत्रिक प्रक्रियेचा भाग म्हणून अत्याधुनिक यंत्राद्वारे माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागापासून ते रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यापर्यंत हा १६ खांबांचा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या प्रकल्पोसाठी १०१ कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला सुमारे ४५ मीटरचे प्रशस्त सर्व्हिस रोड तयार करण्यात आले आहेत. ज्यामुळे बाजारपेठेचा संपर्क कायम राहून ती सुरक्षित झाली आहे.
सध्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले असून, ठेकेदाराने पुलाच्या मुख्य कामाला सुरुवात केली आहे. पुलाची उभारणी भक्कम व्हावी, यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे माती परीक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे बाजारपेठ कुवारबाववासियांचा वाचवण्याचा संघर्ष यशस्वी झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button