
गणपतीपुळे सरपंचपद सर्वसाधारण, वरवडेत महिला नेतृत्वाला संधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गणपतीपुळे आणि वरवडे ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय सदस्यसंख्या व आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली आहे. या सोडतीनंतर दोन्ही गावांतील राजकीय समीकरणांना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
यावेळी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. दुसरीकडे वरवडे ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाल्याने महिला नेतृत्वाला मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
वरवडे ग्रामपंचायतीत एकूण चार प्रभाग असून ११ सदस्यांची निवड होणार आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये नामनिर्देशित मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण अशी तीन जागा राखीव आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये दोन सर्वसाधारण स्त्री व एक सर्वसाधारण जागा आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशा जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये एक सर्वसाधारण स्त्री आणि एक सर्वसाधारण जागा राखीव करण्यात आली आहे.www.konkantoday.com




