
अवैध दारू जिल्हा प्रशासनाच्या रडारवर, जिल्हा प्रशासनाचे निर्देश
अवैध दारू निर्मिती, विक्री आणि हातभट्टीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मनुज जिंदल यांनी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अवैध दारुला प्रतिबंध घालण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. या समित्यांच्या माध्यमातून अवैध दारू व्यवसायावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याबरोबरच दारुबंदीच्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
www.konkantoday.com




