आयटीआय दापोली येथे प्रवेश प्रक्रिया सुरू; २२ मे पासून ऑनलाईन अर्ज


​रत्नागिरी, दि. १६ ):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), दापोली येथे ऑगस्ट २०२६ च्या प्रवेश सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
​या सत्रात उपलब्ध असलेले अनुक्रमे अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता आणि आवश्यक पात्रतेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
संधाता (Welder) १ वर्ष जागा २० शै पात्रता १० वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण. डिझेल मेकॅनिक (Mech. Diesel)१ वर्ष, ४८, १० वी उत्तीर्ण
ड्रेसमेकिंग (Dress Making)१ वर्ष, २०, १० वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण
उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरताना व स्क्रुटिनीच्या वेळी खालील मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे:
​१० वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण गुणपत्रक (Marksheet).
​शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate).
​प्रवर्गानुसार जातीचा दाखला (Caste Certificate).
​नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer).
​अतिरिक्त गुणांसाठी (असल्यास): इंटरमिजीएट चित्रकला परीक्षा, एन.सी.सी. (NCC), किंवा जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्र.
​महत्त्वाच्या सवलती व वैशिष्ट्ये:
​महिला आरक्षण: शासनाच्या नियमांनुसार सर्व व्यवसायांमध्ये एकूण जागांच्या ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
​विद्यावेतन व सवलत: संस्थेत प्रवेश मिळणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु. ५००/- विद्यावेतन तसेच एस.टी. बस पास सवलत देय राहील.
​ऑनलाईन अर्ज व संपर्क:
​प्रवेशासाठीची ऑनलाईन नोंदणी http://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक २२ मे २०२६ पासून सुरू आहे.
​या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती, मार्गदर्शन किंवा अडचणींच्या निवारणासाठी इच्छुकांनी ८५३०६५८३७२ किंवा ९४२०६६५९४६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दापोलीच्या प्राचार्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button