
बाळ माने यांची ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले जाहीर
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी समाज माध्यमावरून जाहीर केली आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत मागे घेतला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या संपूर्ण घडामोडीत मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या हस्तक्षेपानंतरच बाळ माने यांनी माघारीचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
याची दखल घेऊन शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.



