भाजपतर्फे शिक्षक, शिक्षकेतरांसाठी आयोजितजिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत स्नेहा दुदगीकर प्रथम

रत्नागिरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कोकण पदवीधर मतदारसंघ आमदार निरंजन डावखरे आणि रत्नागिरी भाजप पदवीधर सेलतर्फे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहा दुदगीकर, द्वितीय योगेश मुळे आणि तृतीय वैष्णवी कुष्टे यांनी पटकावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारत घडवण्याच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला बळ देत, शिक्षण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी एआय ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या विषयावरच ही स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये जिल्ह्यातील १०० हून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचा निकाल प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, पदवीधर सेल संयोजक मनोज पाटणकर, सहसंयोजक शेखर लेले यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहा श्रीकांत दुदगीकर (रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी, 5000 रुपये, सन्मान चिन्ह), द्वितीय योगेश अरविंद मुळे (जि. प. शाळा पिरंदवणे नं. १, संगमेश्वर, 3000 रुपये, सन्मानचिन्ह) आणि तृतीय क्रमांक वैष्णवी राजेश कुष्टे (एम. एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी, 2000 रुपये, सन्मान चिन्ह) यांनी मिळवला. उत्तेजनार्थ ऋतुजा रमेश गोपाळ (पी. एस. बने इंटरनॅशन स्कूल, देवरुख), मेधा प्रफुल्ल देशपांडे (युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण), किशोर महादेव आंब्रे (रा. रा. शिंदे विद्यालय, ओवळी नांदिवसे चिपळूण) आणि प्रज्ञा मनोहर जठार (न्यू इंग्लिश स्कूल आंबडस, खेड) यांना प्रत्येकी १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे संयोजक पदवीधर सेलचे संयोजक मनोज पाटणकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button