देवरुख रत्नागिरी रस्त्यावर निवे बुद्रुक येथे भीषण अपघात; नमन कलाकाराचा मृत्यू, चौघे जखमी


देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे आज (सोमवारी) सकाळी सुमारे ६ वाजता भीषण अपघात झाला. सायले येथील नमन कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या कलाकारांच्या वॅगनआर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात एका नमन कलाकाराचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य राबवत जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृत कलाकाराची ओळख अद्याप पटलेली नसून जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताची अधिक चौकशी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button